मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दादरच्या चैत्यभूमीत बाबासाहेबांना केले अभिवादन

•राज्यपाल सी.पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना केले अभिवादन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics : राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दादरच्या चैत्यभूमीत बाबासाहेबांना केले अभिवादन

•राज्यपाल सी.पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना केले अभिवादन

मुंबई :- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चैत्यभूमी परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. नरेंद्र जाधव लिखित 'भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

छायाचित्रे · 1/6

Arrow Keys ⟵ ⟶

राज्य सरकार म्हणून आम्ही जे कार्य करू ते संविधान अनुरूप करू. तसेच ते काम करत असताना समाजातील शेवटचा घटक म्हणजेच वंचिताचा विचार करून काम करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा, समानतेचा संदेश आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण अंगीकारला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाबद्दल देखील फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले. भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशाप्रकारे प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेले, याचा अतिशय सुंदर आलेख नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकात आला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: नेक्सस सीवूडमधील इन-मॉल मध्ये 3D क्युबॉइड ॲनामॉर्फिक स्क्रीन ॲडव्हर्टायझिंगमध्ये घडविणार क्रांती

शेअर करा