मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : टिटवाळ्यात भाजपला मोठा धक्का!

•माजी नगरसेवक सुरेश भोईर, प्रदिप भोईर यांचा 'मातोश्री'वर शिवसेनेत (उबाठा) प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics : टिटवाळ्यात भाजपला मोठा धक्का!

•माजी नगरसेवक सुरेश भोईर, प्रदिप भोईर यांचा 'मातोश्री'वर शिवसेनेत (उबाठा) प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन!

मुंबई :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जशी जशी जवळ येत आहे.तसे,ठाणे जिल्ह्यातील राजकारणात मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. टिटवाळ्यातील भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि भाजपचे ठाणे जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी त्यांच्या अनेक निष्ठावान सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. भाजपसाठी हा टिटवाळ्यातील मोठा धक्का मानला जात आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

आज (दिनांक 21 नोव्हेंबर 2025) मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. उद्धवसाहेबांनी स्वतः भोईर बंधूंच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

या प्रवेशामुळे टिटवाळ्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकतो.

यावेळी शिवसेना उपनेते विजय (बंड्या) साळवी, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, जिल्हासंघटक रेखा कंटे आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: Pune News : 'स्वच्छ'तेच्या सेवेत दडलेला प्रामाणिकपणा!

शेअर करा