मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : अबू आझमी महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित, औरंगजेबाचे कौतुक केल्यानंतर कारवाई

•अबू आझमी यांनी औरंगजेबला एक चांगला प्रशासक म्हणून वर्णन केले होते, त्यानंतर त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics

•अबू आझमी यांनी औरंगजेबला एक चांगला प्रशासक म्हणून वर्णन केले होते, त्यानंतर त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. आता त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

मुंबई :- मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना मुघल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या विधानामुळे संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले.बुधवारी कामकाज सुरू होताच चारवेळा आमदार असलेल्या यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला.

अबू आझमीच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (5 मार्च) सांगितले होते. त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात येईल.

सपा आमदार अबू आझमी यांनी मंगळवारी (5 मार्च) औरंगजेबबाबत केलेले वक्तव्य मागे घेत माफी मागितली होती.आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना अबू आझमी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, "मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केलेली नाही. पण तरीही माझ्या बोलण्याने कोणी दुखावले गेले असेल तर मी माझे शब्द, माझे विधान मागे घेतो.

हेही वाचा: MLA Abu Azmi : सपा आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान, गोव्यात मारहाणीचा आरोप

शेअर करा