मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Political Update : "चड्डी बनियन गँग" विरोधात विधानभवनात घोषणाबाजी; संजय गायकवाड प्रकरणावरून महाविकास आघाडीचा एल्गार

Mahavikas Aghadi Latest News : विधानसभेच्या पायऱ्यांवर आक्रमक घोषणाबाजी; सरकारविरोधात संतापाचा स्फोट,गायकवाड यांचा ‘बॉक्सिंग’ अवतार बॅनरवर झळकला; गुंडाराजविरोधात विरोधक एकवटले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Political Update : "चड्डी बनियन गँग" विरोधात विधानभवनात घोषणाबाजी; संजय गायकवाड प्रकरणावरून महाविकास आघाडीचा एल्गार

Mahavikas Aghadi Latest News : विधानसभेच्या पायऱ्यांवर आक्रमक घोषणाबाजी; सरकारविरोधात संतापाचा स्फोट,गायकवाड यांचा ‘बॉक्सिंग’ अवतार बॅनरवर झळकला; गुंडाराजविरोधात विरोधक एकवटले

मुंबई :- शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी आमदार निवासात कर्मचाऱ्याला चड्डी-बनियनवर मारहाण केल्याप्रकरणी राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या धक्कादायक प्रकाराचा निषेध करत महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज (16 जुलै) तीव्र आंदोलन केले.

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, शिवसेना (ठाकरे गट) चे अंबादास दानवे, काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यासह अनेक विरोधी आमदार सहभागी झाले होते. घोषणांचा जलप्रलय करत त्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

"चड्डी बनियन गँग हाय हाय", "या गुंडाराज सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!" अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात वापरण्यात आलेले बॅनर विशेष लक्षवेधी ठरले. एका बॅनरवर "महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो" असा उल्लेख करत, गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतार छायाचित्रासह दाखवण्यात आला होता.

दरम्यान, गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अधिवेशनाच्या उर्वरित तीन दिवसांत विरोधक या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे

शेअर करा