मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर मोक्का; हिवाळी अधिवेशनात कायद्यात सुधारणा

Mumbai News :मुंबई : प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यात मोठे बदल करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर मोक्का; हिवाळी अधिवेशनात कायद्यात सुधारणा
गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर मोक्का; हिवाळी अधिवेशनात कायद्यात सुधारणा

Mumbai News :मुंबई : प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यात मोठे बदल करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.https://maharashtramirror.com/ Mumbai news
गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४ आणि २००३ मधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर अधिक कठोर कलमे लावण्यासोबतच, गंभीर आणि वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद करण्याबाबतही विचार सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
गुन्हे सिद्धतेची प्रक्रिया होणार अधिक प्रभावी
अशा प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासह शिक्षेच्या तरतुदींमध्येही बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून स्त्री भ्रूणहत्या रोखणे हा या सुधारणांचा मुख्य उद्देश आहे.
या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृती दलाची पहिली बैठक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. बैठकीत बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच बोगस डॉक्टरांची यादी तयार करून ती प्रसिद्ध करण्याबाबतही चर्चा झाली.
बेकायदेशीर सोनोग्राफी मशीनच्या विक्रीवर नियंत्रण आणणे आणि जनजागृतीसाठी विशेष कार्यशाळा घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथके नेमण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी विद्यमान कायदा अधिक कठोर करण्याच्या दिशेने राज्य सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा