मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra CM Oath Ceremony: देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पत्र समोर

Maharashtra CM Oath Ceremony Latest Update : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

BJP, Maharashtra Politics, Ajit Pawar, Eknath shinde, Rohit Pawar

Maharashtra CM Oath Ceremony Latest Update : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. गुरुवारी एका भव्य समारंभात ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

मुंबई :- महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis गुरुवारी (5 डिसेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. Maharashtra CM Oath Ceremony त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पत्र आल्याचे चित्र समोर आले आहे.

त्यानुसार उद्या मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी होणार आहे. या ऐतिहासिक मैदानात पंतप्रधान मोदींसोबत भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. पंकजा मुंडे व प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिले.

नाव जाहीर होताच भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी फडणवीस पगडी घालून खुश दिसत होते. भाजपने विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. ऑक्टोबर 2014 पासून ते पाच वर्षे पहिल्यांदा मुख्यमंत्री होते. ते 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 या कालावधीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होते.

विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्याला मोठे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे. आम्ही कोणाला एकटे घेत नाही, सर्वांना सोबत घेत आहोत. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही तयार आहोत. ते म्हणाले की, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मनापासून आभार मानतो.

शेअर करा