मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Assembly Monsoon Session : विधानभवनात 'शक्तिपीठ'चा झणझणीत गजर; शेतकरी, विद्यार्थी आणि अपघाताचे मुद्दे तापले

Maharashtra Assembly Monsoon Session : "गजनी सरकार, विसरभोळा कारभार" — रोहित पवारांचे घणाघाती बॅनर आंदोलन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Assembly Monsoon Session : विधानभवनात 'शक्तिपीठ'चा झणझणीत गजर; शेतकरी, विद्यार्थी आणि अपघाताचे मुद्दे तापले

Maharashtra Assembly Monsoon Session : "गजनी सरकार, विसरभोळा कारभार" — रोहित पवारांचे घणाघाती बॅनर आंदोलन

मुंबई :- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा Maharashtra Assembly Monsoon Session दुसरा दिवस विविध मुद्द्यांनी गाजला. विरोधकांनी शक्तिपीठ महामार्ग, बीड लैंगिक अत्याचार प्रकरण, आणि मुंब्रा लोकल अपघात या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे अधिवेशनाचे वातावरण चांगलेच तापले.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकरी आणि आमदारांनी विधानभवनाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. हातात फलक घेऊन, पायऱ्यांवर बसून, विविध बॅनरद्वारे त्यांनी सरकारचा निषेध केला.

नाना पटोले यांनी भाजप नेते बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी करत पटोले आणि विजय वडेट्टीवार थेट अध्यक्षांच्या डायसपर्यंत गेले. मात्र पटोले यांनी वापरलेल्या असंसदीय भाषेवरून सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज विधानभवन परिसरात बॅनरबाजी करत सरकारवर कडवट टीका केली. “आज कृषी दिन आहे, पण सरकारचे धोरण विसरभोळे आणि घोषणांपुरतेच राहिले आहे. 7/12 डिजिटल करण्याचे आश्वासन, सन्मान निधी वाढ, कर्जमाफी, पीकविमा — या सर्व गोष्टी हवेतच आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

“हे गजनी सरकार आहे, ज्यांना शेतकऱ्यांची आठवण फक्त कृषी दिनाच्या भाषणापुरतीच होते,” अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी सरकारच्या 'विस्मरणशक्ती'वर सवाल उपस्थित केला.

शेअर करा