मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शरद पवार जोरदार टीका

Ajit Pawar Target On Sharad Pawar : शरद पवार यांनी केलेला बंडखोरी म्हणजे डावपेच… मग आम्ही

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit-Pawar-and-Sharad-Pawar

Ajit Pawar Target On Sharad Pawar : शरद पवार यांनी केलेला बंडखोरी म्हणजे डावपेच… मग आम्ही

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस NCP Party फुटी नंतर अजित पवार गटावर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गड्डा कडून टीका करण्यात येत आहे पक्षाचे गद्दारी केल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. अशातच बारामतीच्या सभेमध्ये Baramati Lok Sabha Election अजित पवार Ajit Pawar यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत 1978 सालचा दाखला दिला आहे.

बारामतीच्या सांगवीमध्ये Barmati Sangavi Sabha महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांच्या प्रचार सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.अजित पवार म्हणाले, " 1978 साली दोन्ही काँग्रेसचे सरकार चांगले चालले होते. यशवंतराव चव्हाणांचा विरोध आसताना देखील शरद पवारांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. अनेक दिग्गज नेते त्यांच्या मंत्रिमंडळात आले. यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना मानसपुत्र मानले होते, त्यांना ही भूमिका आवडली नव्हती. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले", असा निशाणा अजित पवार यांनी साधला. Baramati Lok Sabha Election Live News

मग मी काय गद्दारी केली पुढे अजित पवार म्हणाले, "मग मी काय गद्दारी केली.साठीच्यावर वय झाले तरी मी सगळं ऐकत आलो. वय झाल्यावर तरुणांच्या हातात कारभार दिला जातो, पण तसे झाले नाही. शरद पवारांनी राजकीय खेळी केली" असा आरोप अजित पवारांनी केला. यामुळे पवार कुटुंबात आरोप प्रत्यारोप चांगलेच वाढलेले दिसून येत आहेत. Baramati Lok Sabha Election Live News

शेअर करा