मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai South Lok Sabha Election : शिवसेना विरुद्ध शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दक्षिण मुंबईतून उमेदवारी तिकीट दिले

Mumbai South Lok Sabha Election Candidate : दक्षिण मुंबईतून उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत निवडणूक रिंगणात आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai South Lok Sabha Election

Mumbai South Lok Sabha Election Candidate : दक्षिण मुंबईतून उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवर 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

मुंबई ‌:- दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी Mumbai South Lok Sabha Election भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव Yamini Jadhav यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या शिवसेनेने मान्यता दिली आहे. यामिनी जाधव यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत Arvind Sawant यांच्याशी होणार आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांवर मतदान होणार असून त्यात दक्षिण मुंबईचाही समावेश आहे. येथे 20 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे आहे. तर उमेदवारांना 6 मे पर्यंत नावे मागे घेता येतील. Mumbai South Lok Sabha Election Live News

मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांवर कोणत्या पक्षाचे कोण?

  • मुंबई दक्षिण महाविकास आघाडी- अरविंद सावंत, शिवसेना (ठाकरे)
  • महायुती - यामिनी जाधव, (शिवसेना शिंदे)
  • मुंबई दक्षिण मध्य महाविकास आघाडी- अनिल देसाई, शिवसेना (ठाकरे गट)
  • महायुती - राहुल शेवाळे, (शिवसेना शिंदे)
  • मुंबई उत्तर मध्य महाविकास आघाडी - वर्षा गायकवाड, काँग्रेस
  • महायुती - उज्ज्वल निकम, भाजप
  • मुंबई ईशान्य महाविकास आघाडी - संजय दिना पाटील, शिवसेना (ठाकरे)
  • महायुती - मिहीर कोटेचा, भाजप
  • मुंबई उत्तर पश्चिम महाविकास आघाडी - अमोल कीर्तिकर, शिवसेना (ठाकरे)
  • महायुती - रवींद्र वायकर, शिवसेना शिंदे.
  • मुंबई उत्तर एमव्हीए - अद्याप जाहीर केलेले नाही - काँग्रेस महायुती - केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजप या जागांवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. .

    शेअर करा