मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Lalbhaug Cha Raja 2025 Visarjan : 33 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लालबागच्या राजाला निरोप; भरतीमुळे चौपाटीवर विसर्जन थांबले, मंडळावर टीकेची झोड!

Mumbai Lalbhaug Cha Raja Visarjan 2025 : 12 वाजता निघालेली मिरवणूक 33 तासांनी पूर्ण; सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा मंडळावर रोष, 'राजाचा प्रसाद' म्हणत केली खोचक टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Lalbhaug Cha Raja 2025 Visarjan : 33 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लालबागच्या राजाला निरोप; भरतीमुळे चौपाटीवर विसर्जन थांबले, मंडळावर टीकेची झोड!

Mumbai Lalbhaug Cha Raja Visarjan 2025 : 12 वाजता निघालेली मिरवणूक 33 तासांनी पूर्ण; सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा मंडळावर रोष, 'राजाचा प्रसाद' म्हणत केली खोचक टीका

मुंबई :- गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला लालबागचा राजा यंदा विसर्जन मिरवणुकीत 33 तास थांबल्यामुळे चर्चेत आला आहे. Lalbhaug Cha Raja Visarjan 2025 शनिवारी दुपारी 12 वाजता निघालेल्या या मिरवणुकीचा शेवट रविवारी रात्री 9.10 वाजता झाला, त्यामुळे मंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळे मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडथळे आल्याने हा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी दुपारी मोठ्या उत्साहात लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर रविवारी सकाळी साडेसात वाजता पोहोचली. मात्र, यावेळी समुद्राला मोठी भरती असल्यामुळे मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवता आली नाही. त्यामुळे मूर्ती किनारीच थांबून राहिली. अखेर, दुपारी भरती ओसरल्यानंतर कोळी बांधवांच्या मदतीने सायंकाळी साडेसहा वाजता मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आले आणि रात्री 9.10 वाजता राजाचे विसर्जन करण्यात आले.

या विलंबामुळे सोशल मीडियावर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काही नेटकऱ्यांनी 'साधा पाऊस आला तर रस्ता खराब होतो, मग समुद्रातील भरतीचा अंदाज मंडळाला का आला नाही?' असे प्रश्न विचारले. तर, काहींनी मंडळाच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले. 'सामान्य भक्तांना तासन्तास रांगेत उभे ठेवणाऱ्या आणि व्हीआयपींसाठी पायघड्या घालणाऱ्या मंडळाला खुद्द राजानेच चौपाटीवर ताटकळत ठेवले', अशी खोचक टीकाही अनेकांनी केली. या विलंबामुळे गणेशभक्तांमध्ये मात्र नाराजी दिसून आली.

शेअर करा