मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

‘लाडकी सून योजना’ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात योजनेचा शुभारंभ; महिलांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी

Ladki Sunbai Yojana : पीडित सुनांना तात्काळ मदत, तर चांगल्या सासूंचा सन्मान; शिवसेना स्टाईलने होणार अन्यायग्रस्तांना न्याय

V
Vivek

1 मिनिट वाचन

‘लाडकी सून योजना’ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात योजनेचा शुभारंभ; महिलांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी

Ladki Sunbai Yojana : पीडित सुनांना तात्काळ मदत, तर चांगल्या सासूंचा सन्मान; शिवसेना स्टाईलने होणार अन्यायग्रस्तांना न्याय

मुंबई :- राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. ‘लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आली असून, ज्या सुनांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जातो, त्यांना या योजनेतून तात्काळ मदत दिली जाणार आहे. Ladki Sunbai Yojana ठाण्यात नुकताच या योजनेचा भव्य शुभारंभ झाला.

या योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक घरात सुनेला मुलीप्रमाणे सन्मान मिळावा हा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, "जशी आपली मुलगी असते, तशीच सूनही असते. तिलाही सन्मानाने वागवले पाहिजे. अनेक घरांमध्ये सुनांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे." या मोहिमेअंतर्गत, घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी ८८२८८६२२८८ हा विशेष हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

हेल्पलाईनवर तातडीने मिळणार मदत

पीडित महिलांनी न घाबरता या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. सुरुवातीला समुपदेशनाद्वारे कुटुंबात समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण जर ही पद्धत अयशस्वी ठरली, तर ‘आपली शिवसेना स्टाईल आहेच’ असे म्हणत योग्य कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, या योजनेत केवळ अन्यायग्रस्त सुनांनाच मदत केली जाणार नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाईल, जेणेकरून समाजात सकारात्मकता पसरेल.

या योजनेची राज्यस्तरावरची जबाबदारी राज्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून, प्रत्येक शिवसेना शाखा आणि कार्यालये यामध्ये सहभागी होऊन पीडित महिलांना मदत करतील.

शेअर करा