मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kunal Kamra : कॉमेडियन अभिनेता कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे वाद वाढला, तोडफोड प्रकरणी 11 जणांना अटक

• कॉमेडियन कुणाल कामरा Kunal Kamra यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kunal Kamra : कॉमेडियन अभिनेता कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे वाद वाढला, तोडफोड प्रकरणी 11 जणांना अटक

•कॉमेडियन कुणाल कामरा Kunal Kamra यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिप्पणी केली होती.

मुंबई :- कॉमेडियन अभिनेता कुणाल कामरा Kunal Kamra याने एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या 11 जणांना अटक करण्यात आली आहे. खार पोलीस त्याला लवकरच वांद्रे न्यायालयात हजर करणार आहेत. याप्रकरणी राहुल कानल यांना नोटीस देण्यात आली आहे. राहुल कानाल याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. CRPC 42 अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.

कॉमेडियन कुणाल Kunal Kamra कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन निषेध वाढत आहे. आता शिवसेना (शिंदे) गटाकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर कुणाल कामराला अटक करण्याची मागणी करत आहेत.

मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. व्हिडीओ शूट आणि वाद खार पोलीस ठाण्यांतर्गत येतो, त्यामुळे एमआयडीसीमध्ये शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला एफआयआर खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याबाबत विनोदी अभिनेता कुणाल कामरा यांनी केलेली टिप्पणी शिवसेना आमदार निलेश राणे Nilesh Rane यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. कुणाल कामरा जिथे दिसेल तिथे त्याला मारहाण केली जाईल असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा: Angel Rai : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एंजल राय यांना जीवे मारण्याची धमकी

शेअर करा