मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : कोरेगाव पार्कमध्ये बंद फ्लॅट फोडून ३.३५ लाखांचे दागिने लंपास

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोरेगाव पार्क परिसरातील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कोरेगाव पार्कमध्ये बंद फ्लॅट फोडून ३.३५ लाखांचे दागिने लंपास
कोरेगाव पार्कमध्ये बंद फ्लॅट फोडून ३.३५ लाखांचे दागिने लंपास

Pune News : मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांचा घरात प्रवेश

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोरेगाव पार्क परिसरातील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ४ नोव्हेंबरच्या रात्री ते ५ नोव्हेंबरच्या सकाळदरम्यान ही घरफोडी झाली. या प्रकरणी ५८ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कोरेगाव पार्क येथील ओंकार हाइट्स, फ्लॅट क्र. सी-७ हा बंद होता. ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटले. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटातील १५ हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१ (३) आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक झालेला नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करीत आहेत..https://maharashtramirror.com/ Pune News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा