मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune crime कोंढव्यात नियमांचे उल्लंघन केल्याने दोन मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे मालकांवर गुन्हे दाखल

Pune crime पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रशासनाच्या नियमांचे आणि लेझर बीम लाईट बंदीच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या मंडळांचे अध्यक्ष आणि डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एच.एफ.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कोंढव्यात नियमांचे उल्लंघन केल्याने दोन मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे मालकांवर गुन्हे दाखल
कोंढव्यात नियमांचे उल्लंघन केल्याने दोन मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे मालकांवर गुन्हे दाखल

Pune crime पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रशासनाच्या नियमांचे आणि लेझर बीम लाईट बंदीच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या मंडळांचे अध्यक्ष आणि डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एच.एफ. फ्रेंड सर्कल कमेला मंडळ चे अध्यक्ष उमर शब्बीर शेख, डीजे मालक गणपत कामठे (रा. नऱ्हे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिस हवालदार सुभाष जरांडे यांनी याबाबत फिर्याद दिली. दुसऱ्या गुन्ह्यात झुल्फीकार बॉइज मंडळाचे अध्यक्ष राहिल सय्यद मुजावर आणि डीजे मालक अन्वर इम्तियाज शेख (रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलीस अंमलदार राहुल थोरात यांनी याबाबत फिर्याद दिली. https://maharashtramirror.com/ Pune crime

पोलीस सह आयुक्त आणि पोलीस उप आयुक्त (विशेष शाखा) यांनी ईद-ए-मिलाद आणि सुरक्षेच्या कारणास्तव लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी घालणारे आदेश २४ ऑगस्ट रोजी जारी केले होते. या आदेशांचे २६ ऑगस्ट रोजी उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक निजाम तांबोळी या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/

शेअर करा