मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kondhwa News | कोंढव्यात अनाधिकृत बांधकामांचा थैमान : मनपात 'खाडे' मारणारा अधिकारी 'गुपचूप'?

पारगे नगर येथे कारवाई नावालाच : दुसऱ्या बांधकामांकडे डोळेझाक | Kondhwa News अँटी करप्शन विभागाकडून चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता

M
mubarak

1 मिनिट वाचन

kondhwa news

  • पारगे नगर येथे कारवाई नावालाच : दुसऱ्या बांधकामांकडे डोळेझाक | Kondhwa News
  • अँटी करप्शन विभागाकडून चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता
  • पुणे, दि. २७ नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर
    वि.रा. जगताप

    Kondhwa News | जगभरात आयटी हब म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या पुणे शहराला अनाधिकृत बांधकामांचे गालबोट लागले आहे. विशेषतः उपनगरांमध्ये अनाधिकृत बांधकामांनी थैमान घातला आहे. यातही कोंढवा अनाधिकृत बांधकामे व बनावट कागदपत्रांसाठी कुप्रसिद्ध झाला आहे. गुंठा, दोन-तीन गुंठा जागेत ७ ते ९ मजल्याचे टॉवर राजरोसपणे थाटले जात आहेत. तर याकडे महापालिकेत 'खाडे' मारणारे अधिकारी 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करत असल्याचे व अनाधिकृत बिल्डर लॉबीशी जवळीक साधत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. Kondhwa News

    पारगे नगर येथे कारवाई पण …

    नागरिकांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पुणे महापालिकेकडून दाखविण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. एका बांधकामावर कारवाई करून त्याच्या समोरील व बाजूस असलेल्या अनाधिकृत इमारतींना अभय देण्यात येत आहे. महापालिकेत 'खाडे' मारणाऱ्या अधिकाऱ्याकडून अनाधिकृत बिल्डर यांच्याशी जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. या कर्तबगार अधिकाऱ्याची अँटी करप्शन विभागाकडून चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. Pune corporation

    एनए दाखला बनावट ? कोट्यवधींचा महसूल 'बुडाला'!

    पारगे नगर येथे ७ मजली बांधकाम करताना बनावट एनए (अकृषिक दाखला) कागदपत्रे तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. तसेच ८३ क नोंद सातबारा दप्तरी असताना ती नोंद बनावट कागदपत्रांच्या आधारे कमी असल्याचे भासवून खरेदीखत नोंदविले गेले असल्याने कोट्यवधींचे शासकीय महसूल बुडाल्याची चर्चा आहे. Fake NA order, Pune news

    छायाचित्रे · 1/1

    Arrow Keys ⟵ ⟶

    कोंढव्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी खत ?

    कोंढव्यातील अनाधिकृत बांधकामे खरेदी विक्री करताना मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे वापरली जात असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. बनावट कागदपत्रे तयार करून सदनिका खरेदीधारकांची फसवणूक करण्यात येत आहे. बनावट कागदपत्रामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. Fake Document

    हेही वाचा: CM Eknath Shinde Live : 'भाजपचा जो मुख्यमंत्री होईल, त्याला मी पाठिंबा देईन', एकनाथ शिंदेंनी यांच्या मोठे वक्तव्य, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शर्यतीतून बाहेर!

    शेअर करा