मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Manikrao Kokate Rummy Video : ‘रमी’वरून कोकाटेंचा सत्तेत कल्ला!व्हायरल व्हिडीओमुळे मंत्रिमंडळात गोंधळ, राजीनाम्याची मागणी जोरात

Manikrao Kokate Rummy Video : शिंदेंचं प्रतिकूल मत, ‘भिकारी’ वक्तव्यावरूनही संताप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Manikrao Kokate

Manikrao Kokate Rummy Video  : शिंदेंचं प्रतिकूल मत, ‘भिकारी’ वक्तव्यावरूनही संताप

मुंबई :- राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे  Manikrao Kokate Rummy Video अधिवेशनादरम्यान मोबाईलवर 'रमी' खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सत्ताधारी असो वा विरोधक – सर्व स्तरातून कोकाटेंच्या वर्तनावर टीकेचा भडिमार सुरू असून, राजीनाम्याची मागणी उफाळून आली आहे.

या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलं मत मांडत कोकाटेंच्या स्पष्टीकरणाची वाट पाहण्याचा सूर आळवला आहे. “ते म्हणाले आहेत की, हे खरे नाही. त्यामुळे तपासून पाहू, दूध का दूध, पाणी का पाणी होईल,” असे ते म्हणाले. मात्र याच वेळी कोकाटेंनी केलेल्या “शेतकरी भिकारी नाही, सरकार भिकारी आहे” या वादग्रस्त विधानालाही शिंदेंनी विरोध दर्शवला. “असे बोलू नये, ते बोलले असतील तर खेदजनक आहे,” असे त्यांचे स्पष्ट मत होते.

माणिकराव कोकाटे मंत्रीपद स्वीकारल्यापासून विविध कारणांनी चर्चेत राहिले आहेत. यापूर्वीही त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले होते. आता या व्हिडिओ प्रकरणामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार अडचणीत आली आहे.

“कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार का?” या प्रश्नावर शिंदेंनी बॉल अजित पवारांच्या कोर्टात टाकला. “कोकाटे हे त्यांच्या पक्षाचे आहेत. अजित पवार यांची भूमिका काय आहे, ते पाहून निर्णय होईल,” असं ते म्हणाले.

शेअर करा