मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकरांचेच नाव दुबार!

Kishori Pednekar On EC : वरळीतील प्रभाग क्रमांक 199 मधील यादीत गोंधळ; "ही छपाईची चूक असेल, तर आयोगावर कारवाई का नको?" पेडणेकरांचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Kishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकरांचेच नाव दुबार!

Kishori Pednekar On EC : वरळीतील प्रभाग क्रमांक 199 मधील यादीत गोंधळ; "ही छपाईची चूक असेल, तर आयोगावर कारवाई का नको?" पेडणेकरांचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल!

मुंबई :- मुंबई महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या मतदार यादीतील दुबार नावांवरून मोठा राजकीय गदारोळ सुरू असतानाच, आता यादीतील गोंधळाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वरळीतील प्रभाग क्रमांक 199 मध्ये सर्वाधिक दुबार मतदार आढळले असताना, या प्रभागाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pednekar यांचेच नाव दुबार असल्याचे समोर आले आहे.

वरळीत सर्वाधिक गोंधळ

20 नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 227 प्रभागांमध्ये तब्बल 11 लाख दुबार नावे असल्याचे या यादीतून आढळून आले आहे. यापैकी काही नावे दुबार, तिबार नव्हे, तर शंभर वेळा असल्याची गंभीर बाबही प्रशासनाने कबूल केली आहे.
विशेष म्हणजे, सर्वाधिक दुबार नावे ही वरळी प्रभादेवीतील प्रभागांमध्ये आढळली आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग असलेल्या क्रमांक 199 मध्येच सर्वाधिक 8 हजार 207 दुबार नावे आहेत. या यादीत किशोरी पेडणेकर यांचेही नाव दुबार मतदार म्हणून नोंदवले आहे. त्यामुळे आता पेडणेकर यांनाही फॉर्म भरून हमीपत्र द्यावे लागणार आहे.

पेडणेकरांचे आयोगाला आव्हान

आपलेच नाव दुबार आढळल्याने संतप्त झालेल्या किशोरी पेडणेकर यांनी थेट निवडणूक आयोगावर टीका केली.

"सगळेच मतदार जागरूक असतातच असे नाही. एखाद्या मतदाराने हा फॉर्म भरला नाही, तर त्याला मतदान करू देणार नाही, हे चुकीचे आहे."

"माझे नाव दुबार असेल, तर आणखी कोणत्या प्रभागात माझे नाव आहे, ते दाखवा!" असे आव्हान त्यांनी दिले.
त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला, "मग ही छपाईची चूक असेल, तर निवडणूक आयोगावर कारवाई का करू नये?" हा गोंधळ जाणूनबुजून केला आहे का, असाही सवाल त्यांनी केला.

'निवडणूक आयोगाची ढकलगाडी'

दुबार नावे असलेल्या मतदारांना हमीपत्र देण्यासाठी वाढीव दिवस देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मतदार यादी नक्की 'कुठे बसून बनवली?' असा खोचक सवाल त्यांनी केला. मतचोरीच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयोग जबाबदारी केंद्र निवडणूक आयोगावर ढकलत आहे, तर केंद्र आयोग राज्यावर. "निवडणूक आयोगाची ही ढकलगाडी सुरू आहे," अशी टीका त्यांनी केली.

शेअर करा