Khadakwasla Dam : धरणातून ५०० क्युसेकचा विसर्ग सुरू; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
Khadakwasla Dam
2 मिनिट वाचन

Khadakwasla Dam : मुसळधार पावसामुळे धरण ८० टक्क्यांहून अधिक भरण्याची शक्यता; नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन
पुणे, महाराष्ट्र मिरर
Khadakwasla Dam : खडकवासला धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. हा वाढता ओघ लक्षात घेऊन, आज (मंगळवार, ७ जुलै) दुपारी १२ वाजता नवीन मुठा कालव्यातून ५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास, येत्या काही तासांतच धरण ८० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Khadakwasla Dam)

या पार्श्वभूमीवर धरणाच्या मुख्य सांडव्यावरून मुठा नदीपात्रातही कधीही पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (khadakwasla dam water mutha river alert)
परिस्थितीनुसार विसर्ग वाढवणार: कार्यकारी अभियंता
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "मंगळवारी दुपारी १२ वाजता नवीन मुठा कालव्यातून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेला पाऊस आणि पाण्याची आवक यावर आमचे बारीक लक्ष आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास, परिस्थितीची गंभीर दखल घेऊन नदीपात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाईल." (Khadakwasla Dam)
नागरिकांना खबरदारीच्या सूचना
पाटबंधारे विभाग आणि स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील रहिवाशांसाठी तात्काळ सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. धरण क्षेत्रातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग अचानक वाढवला जाऊ शकत असल्याने नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. (Khadakwasla Dam)
PCMC Flood : मुसळधार पावसाने पिंपरी-चिंचवडमध्ये पूरस्थिती गंभीर
पोहणे किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात किंवा नदीकाठच्या भागात कोणाचे काही साहित्य, वाहने अथवा पाळीव जनावरे असल्यास ती त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावीत. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याची तयारी ठेवावी. अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय पातळीवर सज्जता
पुणे पाटबंधारे विभाग आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा धरण क्षेत्रातील आणि मुठा नदीपात्रातील परिस्थितीवर २४ तास बारीक लक्ष ठेवून आहे. सखल भागातील रहिवाशांना त्वरित सतर्कतेच्या सूचना देऊन प्रशासकीय पातळीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. (Khadakwasla Dam)
हेही वाचा: Rain Update : महाबळेश्वर, पाचगणीसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद!
सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, आवश्यक ती खबरदारी व दक्षता बाळगावी आणि पाटबंधारे विभाग तसेच पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. उपनगरातील आणि नदीकाठच्या सोसायट्यांनी देखील आपल्या पातळीवर सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)




