मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : कर्वेनगर, शिवणे परिसरातील प्रलंबित रस्त्यांचा मार्ग मोकळा

कर्वेनगर, शिवणे परिसरातील प्रलंबित रस्त्यांचा मार्ग मोकळा

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कर्वेनगर, शिवणे परिसरातील प्रलंबित रस्त्यांचा मार्ग मोकळा
कर्वेनगर, शिवणे परिसरातील प्रलंबित रस्त्यांचा मार्ग मोकळा

Pune News : महापालिका आयुक्त व महापौरांकडून विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३० मधील वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या त्वरित सोडवण्यासाठी आज महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे कंबर कसली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि महापौरांनी शनिवारी सकाळी १०:३० वाजता कर्वेनगर आणि लगतच्या परिसराचा सविस्तर दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली व संबंधित विभागांना तातडीने अंमलबजावणीचे कडक आदेश दिले.https://maharashtramirror.com/ Pune News

मातोश्री वृद्धाश्रम परिसरातील १२ मीटर डी.पी. रस्त्याचा भू-संपादन प्रस्ताव एका आठवड्यात सादर करण्याचे स्पष्ट निर्देश पथ विभागाला देण्यात आले. तसेच शासकीय जागा त्वरित ताब्यात घेण्याच्या सूचना मालमत्ता व्यवस्थापन विभागास दिल्या आहेत. त्रिमूर्ती जिम कॅनल रस्त्यावरील बाधित रहिवाशांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. १.८० किमी लांबीच्या या महत्त्वाकांक्षी रस्त्यापैकी १.३० किमीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १४,००० चौ.मी. क्षेत्रातील १९ बाधित जागांपैकी ७,००० चौ.मी. क्षेत्राचे TDR प्रस्ताव आणि ७,००० चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश भूसंपादन विभागाला देण्यात आले.

यासोबतच या ३० मीटर डी.पी. रस्त्याचे भूसंपादन त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या.

सनसिटी ते कर्वेनगर नवीन पूल
सिंहगड रस्त्याकडील उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी पथ विभागाने तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

तिरुपती नगर ते गोपीनाथ नगर ३० मीटर डी.पी. रस्ता विकसित करण्याची मागणी स्थानिक सभासदांनी केली. चर्चेअंती हा रस्ता 'प्रकल्पीय काम' म्हणून प्राधान्याने नियोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मातोश्री वृद्धाश्रम चौक (राजाराम पुलाजवळ) होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधींनी तेथे उड्डाणपुलाची मागणी केली. यावर तज्ज्ञ सल्लागारांमार्फत सविस्तर अभ्यास करून योग्य ते नियोजन करण्याचे आदेश प्रकल्प विभागास देण्यात आले.

याशिवाय ए.जे. एव्हेन्यूसमोरील पाणंद रस्त्याची सरकारी जागा असल्याची खातरजमा करून ती तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश मालमत्ता व्यवस्थापन विभागाला देण्यात आले आहेत. जावळकर उद्यान, काकडे सिटीजवळील कर्वेनगर फ्लायओव्हर आणि वारजे ते शिवणे नदीकाठच्या २४ मीटर डी.पी. रस्त्याबाबत अनुक्रमे भवन, प्रकल्प आणि नदी सुधारणा विभागामार्फत योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

शेअर करा