मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : जीवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार अटकेत; येरवडा पोलिसांची कारवाई

कल्याणीनगर येथील गुन्ह्याची उकल; ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

जीवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार अटकेत; येरवडा पोलिसांची कारवाई
जीवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार अटकेत; येरवडा पोलिसांची कारवाई

Pune Crime : कल्याणीनगर येथील गुन्ह्याची उकल; ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल

कल्याणीनगर येथील गुन्ह्याची उकल; ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : कल्याणीनगर परिसरात एका नागरिकाला जीवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी दुचाकीवरून येत नागरिकाच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना जेरबंद केले.येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रम्प टॉवर, कल्याणीनगर समोर ही घटना घडली होती. एक नागरिक फोनवर बोलत उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्याच्याशी वाद घातला. "रागाने का पाहतोस?" असे म्हणत आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या खिशातील १५ हजार १०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

या घटनेप्रकरणी संबंधित नागरिकाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक ३२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५१(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ चे चिलुमूला रजनिकांत आणि येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापुरकर यांनी तपासाबाबत मार्गदर्शन केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळ तसेच परिसरातील तब्बल ८७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींची माहिती मिळवण्यात आली.तपासादरम्यान आरोपी हे हडपसर परिसरात वास्तव्यास असल्याचे आणि ते हडपसर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे येरवडा पोलिसांनी हडपसर पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी आपली नावे निखील ऊर्फ दाद्या शशिकांत कांबळे (वय २६, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे) आणि अयान नासीर शेख (वय २२, रा. गल्ली क्रमांक १९, सय्यदनगर, हडपसर, पुणे) अशी सांगितली.चौकशीदरम्यान आरोपींनी कल्याणीनगर येथे एका नागरिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून फिर्यादीच्या नावाचे आधारकार्ड, १० हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५० हजार रुपये किमतीची एमएच १२ वायव्ही ७७३५ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी निखील ऊर्फ दाद्या कांबळे हा चोरी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हडपसर पोलीस ठाणे तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अयान शेख याच्यावर चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, बालाजी सोगे, गणेश पालवे, संदिप जायभाय, नटराज सुतार आणि सोमनाथ गायकवाड यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

शेअर करा