मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan News : दुर्गाडी किल्ल्यावर जाण्याची परवानगी नाकारली; शिवसैनिकांचा घंटानाद आंदोलनातून जोरदार विरोध!

•"नमाजास परवानगी, तर प्रार्थनेलाही का नाही?" असा सवाल शिवसैनिकांचा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan News : दुर्गाडी किल्ल्यावर जाण्याची परवानगी नाकारली; शिवसैनिकांचा घंटानाद आंदोलनातून जोरदार विरोध!

•"नमाजास परवानगी, तर प्रार्थनेलाही का नाही?" असा सवाल शिवसैनिकांचा

कल्याण | बकरी ईदच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू भाविकांना प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ, शनिवारी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी संयुक्तपणे 'घंटानाद आंदोलन' करत प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी नमाजासाठी मुस्लिम समाजाला परवानगी मिळत असताना, त्याच ठिकाणी हिंदू भाविकांना प्रार्थनेसाठी प्रवेश नाकारला जातो, ही दुजाभावाची वागणूक असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

कल्याणमधील लालचौकी येथे शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील, तर ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी, सचिन बासरे आणि महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक एकवटले होते. शिवाजी चौक ते लालचौकी असा मोर्चा काढत "दुर्गाडी किल्ला मुक्त करा" अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

पोलिसांनी रस्तारोधक लावून रोखले आंदोलन; दोन्ही गटातील कार्यकर्ते ताब्यात

पोलिसांनी लालचौकी येथे रस्तारोधक लावून दुर्गाडी किल्ल्याचा मार्ग बंद केल्याने, दोन्ही गटांचे शिवसैनिक आक्रमक झाले. काही कार्यकर्ते रस्तारोधक चढून पोलिसांचा बंदोबस्त तोडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी कडवा प्रतिकार करत कोणालाही पुढे जाऊ दिले नाही. संतप्त शिवसैनिकांनी लालचौकी येथेच मोठ्या आवाजात आरती सुरू करत मनाई आदेशाचा भंग केला. यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

दरम्यान, संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सकाळपासून दुर्गाडी परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती, त्यामुळे मोठी कोंडी टळली.

हेही वाचा: Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी; पुढील काही तासांत पावसाचा तीव्र वाढीचा इशारा

शेअर करा