मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan Fake Police Scam : तोतया पोलिसांने लुटले 4.80 लाखांचे दागिने

Kalyan Latest Crime News : पोलिस असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वार तीन भामट्याने 54 वर्षीय व्यक्तीचे सुमारे 4.80 लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan Fake Police Scam : तोतया पोलिसांने लुटले 4.80 लाखांचे दागिने

Kalyan Latest Crime News : पोलिस असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वार तीन भामट्याने 54 वर्षीय व्यक्तीचे सुमारे 4.80 लाख रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील डोंगराळी येथे घडली. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाणेमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कल्याण :- पोलिस Police officer असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वार तीन भामट्याने 54 वर्षीय व्यक्तीचे सुमारे 4.80 लाख रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना मुंबई नाशिक महामार्गावरील डोंगराळी भागात घडली. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाणेमध्ये Kongaon Police Station गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. Kalyan Latest Crime News

काशिनाथ पांडुरंग पाटील (54 वर्ष, रा. घनसोली नवी मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबई-नाशिक वाहिनीवरून डोंगराळी येथून घराकडे जात असताना. मागून दुचाकीवर आलेल्या तीन भामट्याने पाटील यांना थांबवले. ‘मी पोलिस असून, पुढे वातावरण चांगले नाही. त्यामुळे अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवा,’ असे पाटील यांना त्याने सांगितले. पाटील यांनी गळ्यातील चैन आणि ब्रेसलेट काढून आरोपी बोलण्यात गुंतून हातचलाखीने काढून घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. घडलेल्या घटनेबाबत पाटील यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 204, 318 (4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असेल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुमसे करत आहे. Kalyan Latest Crime News

हेही वाचा: Mumbra Murder News : किरकोळ वादातून निघृण हत्या; फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध

हेही वाचा: Lalbaug Bus Accident: मुंबईत भीषण अपघात ; मुंबईतील लालबागमध्ये बेस्ट बसने वाहनांना धडक दिल्याने एक ठार, 8 जखमी

शेअर करा