मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan - Dombivli News : मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! कल्याण-डोंबिवलीत 'कमळ' फुलले; दोन उमेदवार बिनविरोध विजयी

•रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांनी मारली बाजी; महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत आता चुरस वाढली

V
Vivek

2 मिनिट वाचन

Kalyan - Dombivli News : मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! कल्याण-डोंबिवलीत 'कमळ' फुलले; दोन उमेदवार बिनविरोध विजयी

•रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांनी मारली बाजी; महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत आता चुरस वाढली

कल्याण-डोंबिवली | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) 122 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपने मतदानाआधीच दोन जागा खिशात घातल्या आहेत. अर्जांच्या छाननीपूर्वीच या दोन जागांवर अन्य कोणाचेही अर्ज नसल्याने भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाला सुरुवातीलाच मोठी आघाडी मिळाली आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

कोण आहेत हे बिनविरोध विजेते?

रेखा राजन चौधरी (प्रभाग 18 अ): कल्याणमधील या प्रभागातून रेखा चौधरी यांनी भाजपची उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा प्रभाग 'नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला' (OBC Female) साठी राखीव होता. त्यांच्या विरोधात इतर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज न भरल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या असून भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत.

आसावरी केदार नवरे (प्रभाग 26 क): डोंबिवलीतील या प्रभागातून आसावरी नवरे यांनी 'खुल्या प्रवर्गातून' उमेदवारी अर्ज भरला होता. येथेही त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.

केडीएमसी 2026: नवे राजकीय समीकरण

यावेळी कल्याण-डोंबिवलीत युती आणि आघाड्यांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. प्रामुख्याने महायुती आणि ठाकरे-मनसे युती यांच्यात थेट लढत होणार आहे.

महायुती (भाजप + शिंदे सेना)

शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 66 जागा

भाजप: 56 जागा (ज्यात 2 जागा आधीच जिंकल्या आहेत)

विशेष नोंद: अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट महायुतीतून बाहेर पडला असून ते 42 जागांवर स्वतंत्रपणे लढणार आहेत.

ठाकरे-मनसे युती

शिवसेना (उद्धव ठाकरे गट): 68 जागा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे): 54 जागा (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे या निवडणुकीत 'मराठी मतांचे' ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे.)

तिसरी आघाडी

काँग्रेस (55 जागा) + राष्ट्रवादी शरद पवार गट (45 जागा) + वंचित बहुजन आघाडी (12 जागा) यांनीही एकत्र येत 'महाविकास आघाडी' म्हणून तिसरे आव्हान उभे केले आहे.

15 जानेवारीला फैसला

बिनविरोध निवडीमुळे भाजपचे मनोधैर्य वाढले असले तरी, उर्वरित 120 जागांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील, तेव्हाच कल्याण-डोंबिवलीवर कोणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होईल.

हेही वाचा: Mumbai Political News : महायुतीत बिघाडी! राज्यातील 14 महापालिकांमध्ये भाजप-शिंदे गट स्वतंत्र; मुंबई-ठाण्यात मात्र अजित पवार 'आऊट'

शेअर करा