मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित क्षेत्रात रूपांतर

नागरिकांच्या एकजुटीमुळे परिसराला मिळाले नवे रूप

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित क्षेत्रात रूपांतर
कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित क्षेत्रात रूपांतर

Pune News : नागरिकांच्या एकजुटीमुळे परिसराला मिळाले नवे रूप


Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : एनआयबीएम रोडवरील ‘एलिना लिव्हिंग’समोरील महापालिकेच्या मोकळ्या जागेत गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा त्रास आणि असामाजिक प्रकार वाढले होते. मात्र, स्वातंत्र्यदिनी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत पुढाकार घेतला आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे सुंदर हरित क्षेत्रात रूपांतर केले. नागरिकांच्या एकजुटीमुळे परिसराला नवे आणि स्वच्छ रूप मिळाले. एलिना लिव्हिंग, रहेजा विस्टा आणि परिसरातील इतर सोसायट्यांच्या जवळपास सत्तरहून अधिक नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी (दि.१५) एकत्र येऊन श्रमदानातून ही जागा स्वच्छ केली. https://maharashtramirror.com/ Pune News
परिसरामध्ये हजारो कुटुंबे राहतात, त्यामुळे ही जागा स्वच्छ करून भविष्यात ती अधिक हरित आणि सुरक्षित ठेवण्याचा दृढ संकल्प नागरिकांनी केला आहे. गरिकांनी या ठिकाणी वटवृक्ष, पिंपळ, कडुनिंब आणि मुचकुंद यांसारख्या विविध जातींची अडीचशेहून अधिक झाडे व रोपे लावली. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रत्येक रोप हे एका जवानाला समर्पित करण्यात आले आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि सेवा बजावणाऱ्या जवानांप्रती नागरिकांनी या अनोख्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली. एक वनस्पती. एक सैनिक. एक आदरांजली." हा संदेश समोर ठेवून नागरिक आता या प्रत्येक रोपाची नियमित निगा राखत आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News
स्थानिक रहिवासी आणि वनस्पतीशास्त्रज्ञ भूपेश शर्मा यांच्या मते, हा उपक्रम केवळ वृक्षारोपण पुरता मर्यादित नसून, ती जागा पुन्हा कचराकुंडी बनू नये म्हणून केलेली ही एक सातत्यपूर्ण मोहीम आहे. नागरिकांच्या या स्वयंप्रेरित प्रयत्नांना प्रशासनाचे सहकार्य लाभून ही जागा कायमस्वरूपी स्वच्छ, हरित आणि सुरक्षित राहील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा