मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jitendra Awhad: "विधानसभेच्या दरम्यान आव्हाडांना धमकीचा मेसेज; पडळकर समर्थकांचा हात?"

Jitendra Awhad: अमर कोळी नावाचा युवक, पाडळकरसोबतचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jitendra Awhad: "विधानसभेच्या दरम्यान आव्हाडांना धमकीचा मेसेज; पडळकर समर्थकांचा हात?"

Jitendra Awhad: अमर कोळी नावाचा युवक, पाडळकरसोबतचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | राज्यातील पावसाळी अधिवेशनात वादळ निर्माण करणारी घटना बुधवारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांना विधानसभा सुरू असतानाच धमकीचा मेसेज आल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला. हा मेसेज गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने पाठवला असल्याचा गंभीर आरोपही आव्हाडांनी केला आहे.

आव्हाड यांनी संबंधित मोबाईल क्रमांकासह धमकीचा मजकूर जाहीर करत, “हा मेसेज अमर कोळी नावाच्या व्यक्तीने पाठवला आहे. आणि त्याचा फोटो भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबतचा आहे,” अशी माहिती दिली. त्याचबरोबर, “आता या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री काय कारवाई करतात?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

या पार्श्वभूमीवर पडळकर आणि आव्हाड यांच्यातील जुना वादही पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी विधानभवन गेटवर या दोघांमध्ये वाद झाला. "पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा मला लागला, त्यानंतर त्यांनी मुद्दाम त्रास दिला," असा आरोप आव्हाडांनी केला. शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्थिती निर्माण झाल्यानं हा वाद चांगलाच पेटला होता.

गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तणावाचं वातावरण होतं. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी विधानभवन गेटजवळच “मंगळसूत्र चोर” असा उल्लेख करत पडळकरांवर टीका केली होती. त्यामुळे आता ही धमकी कोणत्या हेतूनं देण्यात आली? हे समजून घेणं आणि कारवाई होणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेअर करा