मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jishan Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दीकी यांना धमकी देणाऱ्याला अटक

Jishan Siddique News : दाऊदच्या नावावर 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप; पोलिसांकडून गुन्हेगारी टोळीशी संबंधाचा तपास सुरू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jishan Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दीकी यांना धमकी देणाऱ्याला अटक

Jishan Siddique News : दाऊदच्या नावावर 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप; पोलिसांकडून गुन्हेगारी टोळीशी संबंधाचा तपास सुरू

मुंबई :- माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी Jishan Siddique यांना धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या मोहम्मद दिलशाद नावेद या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch अटक केली आहे. त्रिनिदाद अँड टोबॅगोमधून मुंबई विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात 'लुक आऊट सर्क्युलर' जारी करण्यात आले होते.

झिशान सिद्दीकी यांना 21 एप्रिल रोजी त्यांच्या ई-मेल आयडीवर धमकीचा ई-मेल आला होता. त्यानंतर दोन दिवसांत त्यांना अनेक ई-मेल पाठवण्यात आले. त्यात आरोपीने 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि दाऊद टोळीच्या नावाचा उल्लेख केला होता. यानंतर झिशान यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता.

यापूर्वीही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर ऑक्टोबर महिन्यात झिशान आणि अभिनेता सलमान खान यांना धमकीचे फोन आले होते. निर्मल नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे, आरोपी मोहम्मद नावेदचा कोणत्या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीच्या चौकशीतून या गुन्ह्यांमागे काही मोठा कट आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने, त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे झिशान सिद्दीकी यांनाही मोठ्या मानसिक दबावाला सामोरे जावे लागले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मूळ सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

शेअर करा