मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jayant Patil : महाराष्ट्रात राजकीय गदारोळ वाढला, अजित पवार गटाच्या नेत्याची जयंत पाटील यांची भेट, बंद दरवाजाआड काय घडलं?

Jayant Patil Meet Babajani Durran : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jayant Patil : महाराष्ट्रात राजकीय गदारोळ वाढला, अजित पवार गटाच्या नेत्याची जयंत पाटील यांची भेट, बंद दरवाजाआड काय घडलं?

Jayant Patil Meet Babajani Durran : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे.

परभणी :- विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर होणार असून, त्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil संघटनात्मक बांधणी मजबूत करत आहेत. या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी Babajani Durran यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.

जयंत पाटील यांनी विधान परिषद सदस्य आणि अजित पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची त्यांच्या पाथरी येथील निवासस्थानी भेट घेतल्याने बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता बळावली आहे. बाबाजानी दुर्राणी हे सध्या अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष असून त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ काही दिवसात संपत आहे. जयंत पाटील यांच्याशी त्यांची बैठक बंद खोलीत झाली.

अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke)  यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. आता अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अतुल बेनके म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात."

हेही वाचा: Maharashtra Politics : 'उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवावे', शिंदे गट पुन्हा हायकोर्टात

शेअर करा