मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

बॉलिवूडची ‘ग्लॅमरस’ जान्हवी आता व्यसनांविरुद्ध लढणार

मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल जान्हवी कपूर आता अभिनयामुळे नाही, तर एका सामाजिक विषयामुळे चर्चेत आली आहे.

DJ
Dattatraya Jadhav

1 मिनिट वाचन

Janhvi kapoor Will Now Fight Against Addiction.
Janhvi kapoor Will Now Fight Against Addiction.

‘Off the Rocks’ मोहीम केली सुरू

मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल जान्हवी कपूर  आता अभिनयामुळे नाही, तर एका सामाजिक विषयामुळे चर्चेत आली आहे. रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस भूमिका साकारणाऱ्या जान्हवीने  व्यसनमुक्तीसाठी मोहिम सुरू केली आहे.

आजकालच्या हाय-फाय सोसायट्या आणि सोशल सर्कलमध्ये 'ड्रिंक्स' घेणे ही एक फॅशन किंवा 'कूल' दिसण्याची पद्धत झाली आहे. पण हीच फॅशन कधी जीवघेण्या व्यसनात बदलते, हे कळतही नाही. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी जान्हवीने 'अमाहा' या मानसिक आरोग्य संस्थेसोबत हातमिळवणी केली आहे. त्यातूनच तिने ‘Off the Rocks’ नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली,अनेकदा लोक केवळ गंमत म्हणून किंवा ग्रुपमध्ये सामावून घेण्यासाठी मद्यपान सुरू करतात. पण हे विसरतात की मद्याचे व्यसन ही केवळ वाईट सवय नसून ती एक वैद्यकीय स्थिती आहे. याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर, वागण्यावर आणि भावनांवर होतो. केवळ शरीरच नाही तर मनही पोखरले जाते, यावर प्रकाश टाकण्यासाठी मी 'अमाहा' या संस्थेसोबत जोडले गेले आहे.  'दारू सोडणे' ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नसून, ते एक सकारात्मक पाऊल आहे, हे मी या संस्थेमार्फत चालवत असलेल्या ‘Off the Rocks’ मोहिमेतून पटवून देत आहे. हीमोहीम केवळ मद्याबद्दल नसून ती आरोग्यपूर्ण जीवनशैली निवडण्याबद्दल आहे. आता ही मोहीम किती लोकांचे आयुष्य बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!

Bollywood's 'Glamorous' Janhvi Will Now Fight Against Addiction.

शेअर करा