बॉलिवूडची ‘ग्लॅमरस’ जान्हवी आता व्यसनांविरुद्ध लढणार
मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल जान्हवी कपूर आता अभिनयामुळे नाही, तर एका सामाजिक विषयामुळे चर्चेत आली आहे.
1 min read

‘Off the Rocks’ मोहीम केली सुरू
मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल जान्हवी कपूर आता अभिनयामुळे नाही, तर एका सामाजिक विषयामुळे चर्चेत आली आहे. रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस भूमिका साकारणाऱ्या जान्हवीने व्यसनमुक्तीसाठी मोहिम सुरू केली आहे.
आजकालच्या हाय-फाय सोसायट्या आणि सोशल सर्कलमध्ये 'ड्रिंक्स' घेणे ही एक फॅशन किंवा 'कूल' दिसण्याची पद्धत झाली आहे. पण हीच फॅशन कधी जीवघेण्या व्यसनात बदलते, हे कळतही नाही. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी जान्हवीने 'अमाहा' या मानसिक आरोग्य संस्थेसोबत हातमिळवणी केली आहे. त्यातूनच तिने ‘Off the Rocks’ नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली,अनेकदा लोक केवळ गंमत म्हणून किंवा ग्रुपमध्ये सामावून घेण्यासाठी मद्यपान सुरू करतात. पण हे विसरतात की मद्याचे व्यसन ही केवळ वाईट सवय नसून ती एक वैद्यकीय स्थिती आहे. याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर, वागण्यावर आणि भावनांवर होतो. केवळ शरीरच नाही तर मनही पोखरले जाते, यावर प्रकाश टाकण्यासाठी मी 'अमाहा' या संस्थेसोबत जोडले गेले आहे. 'दारू सोडणे' ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नसून, ते एक सकारात्मक पाऊल आहे, हे मी या संस्थेमार्फत चालवत असलेल्या ‘Off the Rocks’ मोहिमेतून पटवून देत आहे. हीमोहीम केवळ मद्याबद्दल नसून ती आरोग्यपूर्ण जीवनशैली निवडण्याबद्दल आहे. आता ही मोहीम किती लोकांचे आयुष्य बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!
Bollywood's 'Glamorous' Janhvi Will Now Fight Against Addiction.


