मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच ठरवून दिली होती; राष्ट्रवादीकडून राजकीय चर्चांवर स्पष्टीकरण

•अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीवर पक्षाकडून मोठा खुलासा; सर्व नेत्यांमध्ये संपूर्ण एकजूट असल्याचा दावा

V
Vivek

1 मिनिट वाचन

sunetra pawar

•अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीवर पक्षाकडून मोठा खुलासा; सर्व नेत्यांमध्ये संपूर्ण एकजूट असल्याचा दावा

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर रंगलेल्या राजकीय चर्चांवर आता पक्षाकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आले आहे. विधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर राष्ट्रवादीच्या सहा ते सात बड्या नेत्यांनी अचानक दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात होते. या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार उपस्थित नसल्यामुळे पक्षात अंतर्गत वाद किंवा नेतृत्त्वावरून मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच ठरवून दिल्याचा दावा

या सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी आणि नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, अमित शाह यांच्यासोबतच्या या बैठकीची संपूर्ण रूपरेषा आणि भेटीची वेळ खुद्द पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीच ठरवून दिली होती. त्यामुळे या भेटीविषयी विरोधकांकडून किंवा माध्यमांमध्ये ज्या उलटसुलट चर्चा रंगवल्या जात आहेत, त्या पूर्णपणे निराधार आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या या शिष्टमंडळामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता.

आगामी राजकीय घडामोडींवर पक्षाचे मंथन

या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान राज्यातील महायुतीमधील समिकरणे, सहकार क्षेत्रातील घडामोडी आणि आगामी राजकीय रणनीतीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पक्षांतर्गत कोणतीही दरी नसून सर्व नेते एकत्र मिळून आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत, असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. या भेटीनंतर आता मुंबईतील 'देवगिरी' बंगल्यावर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कोअर समितीच्या बैठकीत या संपूर्ण घडामोडींवर सविस्तर मंथन होणार असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांच्या 'चिनी फंडिंग'च्या आरोपावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, "आधी स्वतःचे बघा, चीन देशात घुसलाय…"

शेअर करा