मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IPS Transfer List : राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची लाट; 51 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

• राज्यभरातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काहींना बढती, काहींना पदोन्नती

V
Vivek

1 मिनिट वाचन

IPS Transfer List : राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची लाट; 51 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

•राज्यभरातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काहींना बढती, काहींना पदोन्नती

मुंबई | महाराष्ट्रात महायुती सरकारच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले जात असून, यंदा तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून, काहींना पदावनतीच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर हालचाल आणि अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत नव्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

राज्यभरात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव, संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेषतः मुंबईत तब्बल पाच नवीन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये तुषार पाटील, विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांचा समावेश आहे. ही सर्व नेमणुका पदोन्नतीच्या आधारावर करण्यात आल्याची माहिती आहे.

पुण्यात देखील मोठा फेरबदल करण्यात आला असून, शस्त्र निरीक्षक शाखेतील तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 मध्ये समादेशकपदी बदली झाली आहे. महेंद्र पंडित यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे व परिमंडळ-2 चे उपायुक्त स्मार्तना पाटील यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी तीन नवीन आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे.

बदली झालेल्या आयपीएस अधिकाऱ्या यादी

हेही वाचा: Panvel News : खारघर येथील गोल्डन वाईन मार्टची परवानगी रद्द करण्याची मागणी; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त बैठक

शेअर करा