मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IPS & IAS Transfer List : राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या

• सीआयडी’च्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी शशिकांत महावरकर यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती परंतु त्यांची पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांच्यावर पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड पदाची जबाबदारी देण्यात आली आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

अंमली पदार्थ विरोधी दिन

•सीआयडी’च्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी शशिकांत महावरकर यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती परंतु त्यांची पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांच्यावर पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड पदाची जबाबदारी देण्यात आली आहे

मुंबई :- लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पुन्हा एका कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचे बदलीसत्र सुरू झाले आहे. या बदली प्रक्रियेला गृह विभागाने सुरुवात केली आहे. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या या बदलीनंतर संबंधित अधिकारी निवडणुकीपूर्वी नव्या ठिकाणी स्थिरावतील अशा हिशोबाने सरकारने बदली आदेश काढले आहेत. परंतु जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढलेल्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा सरकारने फेरबदल करून काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे फेरबदल केले आहे.महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु आता त्यांची बदली पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड करण्यात आली आहे.

अधिकाऱ्याचे नाव‌ - सध्याचे पदभार - नवीन नियुक्तीचे ठिकाण

1.सुहास वारके - विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई - विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

2.अश्वती दोरजे - विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई - विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

3.शशिकांत महावरकर - विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे - पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड

4.एस.जी. दिवाण - पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र राज्य, पुणे.- पोलीस उप महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

शेअर करा