मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IPS officers Transfer List : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

•IPS Officers Transfer List राज्यातील पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूरच्या सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची मुंबईत बदली झाली होती.

V
Vivek

1 मिनिट वाचन

IPS officers Transfer List : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

•IPS Officers Transfer List राज्यातील पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूरच्या सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची मुंबईत बदली झाली होती.

मुंबई :- विधानसभेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्याच्या गृह विभागाने राज्य पोलिस दलातील भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत. IPS officers Transfer List

गृह विभागाने गुरुवारी पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त निसार तांबोळी यांच्याकडे नागपूर (शहर) सहआयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत यांच्याकडे राज्य गुप्तवार्ता विभागातील सागरी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, भंडाराचे अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडे सहायक पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) अशी जबाबदारी देण्यात आली आहे, तर वर्धाचे अधीक्षक नुरूल हसन आणि नंदूरबारचे अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांची अलीकडेच बदली करण्यात आली होती. त्यांच्या सुधारित बदलीचे आदेशही गुरुवारी गृहविभागाने जारी केले. नव्या आदेशानुसार हसन यांची भंडारा, तांबे यांची नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. IPS officers Transfer List

हेही वाचा: Sharad Pawar : 'मी स्वतः तुमच्यासोबत मुख्यमंत्र्यांना भेटेन…' असे आश्वासन शरद पवार यांनी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना दिले.

शेअर करा