मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक! शेती ते शहर विकासापर्यंत महत्त्वपूर्ण निर्णय; एआय धोरण, मेट्रो, आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पांना गती

•राज्यातील कृषी क्षेत्रात एआय धोरणाला मंजुरी; महावेद व विंड्स प्रकल्पांची मुदतवाढ

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक! शेती ते शहर विकासापर्यंत महत्त्वपूर्ण निर्णय; एआय धोरण, मेट्रो, आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पांना गती

•राज्यातील कृषी क्षेत्रात एआय धोरणाला मंजुरी; महावेद व विंड्स प्रकल्पांची मुदतवाढ

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. ग्रामीण शेती, शहरी विकास, शिक्षण, आदिवासी प्रोत्साहन आणि ऐतिहासिक प्रकल्पांसाठी अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

कृषी विभागाच्या वतीने ‘महा-अ‍ॅग्री एआय धोरण 2025-2029’ ला मंजुरी देण्यात आली. या धोरणामुळे शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता व इतर प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करून क्रांती घडवण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, 'विंड्स प्रकल्पा'अंतर्गत 'महावेद' योजनेची मुदत वाढवून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरी विकासाच्या दृष्टीने, मुंबई मेट्रो मार्ग 2, 2बी आणि 7 या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांकरिता आशियाई विकास बँक व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडीची मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच, विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक कॉरिडॉर प्रकल्पाला ‘बांधा, चालवा आणि हस्तांतरण’ या आधारावर मंजुरी देण्यात आली.

आदिवासी भागातील औद्योगिक वाढीस चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 29 हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आली आहे. या जमिनीवर ‘आदिवासी औद्योगिक क्लस्टर’ विकसित केला जाणार असून, आदिवासी उद्योजकांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात, एनआरआय नागरिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश व शुल्क नियमन अधिनियमात सुधारणा करण्यात आली. याशिवाय, गोरेगाव येथील टेकडीवरील जमीन महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला हस्तांतरित करताना स्टॅम्प ड्युटीत सूट देण्यात आली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या भाडेकरारासाठी विशेष उद्देश संस्था (SPV) व अन्य यंत्रणांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत गती येणार आहे.

तसेच, आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपत्काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांना मिळणाऱ्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली असून, त्यांच्या जिवंत असलेल्या जोडीदारालाही आता हा लाभ दिला जाणार आहे.

हेही वाचा: Thane News : खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश: माथाडी संघटनेच्या नावावर 10 लाखांची मागणी, दोघे अटकेत!

शेअर करा