मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

९९९९…११११ हवेत? त्वरा करा, नोंदणी सुरु झाली!

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी आरटीओ पुणे येथे अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

९९९९…११११ हवेत? त्वरा करा, नोंदणी सुरु झाली!

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी आरटीओ पुणे येथे अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

महत्वाचे मुद्दे

  • खाजगी चारचाकी वाहनांसाठी विहित शुल्क भरून पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत
  • ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू वाहनांसाठी इच्छुकांनी दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत
  • पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे परिवहन (ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू) वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येत असून, आकर्षक व पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज व लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
    खाजगी चारचाकी वाहनांसाठी इच्छुक नागरिकांनी विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट (डीडी), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता लिलाव प्रक्रिया पार पडेल.
    ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू वाहनांसाठी इच्छुकांनी दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी १७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसिद्ध करण्यात येईल व त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता लिलाव होईल.
    डिमांड ड्राफ्ट “R.T.O., Pune” यांच्या नावे राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेतून काढलेला असावा. लिलावाकरिता डीडी एकाच सीलबंद पाकिटात जमा करणे बंधनकारक आहे.
    एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. राखीव क्रमांक घेतल्यानंतर ३० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी परत मिळणार नाही, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी स्पष्ट केले आहे.

    Want 9999…1111? Hurry, registration has started!

    शेअर करा