मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मस्जिदवरील लाउडस्पीकर वादावर सह्याद्री अतिथिगृहात उच्चस्तरीय बैठक

•उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक संघटनांचे शिष्टमंडळ पोलिसांच्या कारवाईविरोधात उतरले मैदानात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ladki Bahin Yojana: Big scam in Ladki Bahin Yojana; Deputy Chief Minister Ajit Pawar admitted the mistakes of the scam!

•उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक संघटनांचे शिष्टमंडळ पोलिसांच्या कारवाईविरोधात उतरले मैदानात

मुंबई | राजधानीतील सह्याद्री अतिथिगृहात आज (25 जून) सकाळी 8.30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मस्जिदांवरील लाउडस्पीकरविषयी वाढलेल्या वादग्रस्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सना मालिक, नवाब मलिक, आमदार जीशान सिद्दीकी, सिद्धार्थ कांबळे, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, एआयएमआयएमचे वारिस पठाण, तसेच राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.

शिष्टमंडळाचे म्हणणे आहे की, अलिकडच्या काळात पोलिसांकडून काही भागांतील मस्जिदांवर लावलेले लाउडस्पीकर कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात येत आहेत. त्यांच्या मते, उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण मर्यादा 45 ते 56 डेसिबल निश्चित केली असली, तरी पोलिसांकडून कोणतीही मोजणी न करता सरसकट कारवाई होत आहे. हे पद्धतशीरपणे अन्यायकारक असल्याचा त्यांचा ठाम दावा आहे.

अबू आजमी यांनी या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, "या मोहिमेचा प्रारंभ सोमय्यांनीच केला आहे. ते मुस्लिमबहुल गोवंडी परिसरात जाऊन पोलीस यंत्रणांवर दबाव आणत आहेत, ज्यामुळे स्थानिक पोलीसही स्पीकर काढण्यास भाग पाडले जात आहेत."

मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, नियमभंग झाल्यास नोटीस देऊन कारवाई करावी किंवा परवाना रद्द करावा; पण कोणतेही मूल्यांकन न करता सरसकट लाउडस्पीकर उतरवणे हे अलोकशाही आणि द्वेषपूर्ण आहे.

बैठकीत सहभागी नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या प्रश्नावर हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यांच्यावर मुस्लिम समाजाचा विश्‍वास असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. "विशालगडमधील झोपडपट्ट्यांवरील कारवाई, सातारामधील मुस्लिम युवकाची हत्या आणि मीरा रोड दंगलीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नेहमीच समतोल भूमिका घेतली आहे. याही विषयात ते न्याय्य भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे," असे संघटनांनी नमूद केले.

हेही वाचा: Tejasvee Ghosalkar : महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे गटाची महिला फळी सज्ज!

शेअर करा