मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Hasan Mushrif On Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्री छगन भुजबळांवर टीका

• भुजबळांकडून जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण, मुश्रीफांची भुजबळांवर टिका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Hasan Mushrif On Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्री छगन भुजबळांवर टीका

•भुजबळांकडून जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण, मुश्रीफांची भुजबळांवर टिका

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करताना आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. त्यामुळे भाजपने आव्हाड यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करून संताप व्यक्त केला आहे. मात्र असं असतानाच महायुतीतील मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ हे आव्हाड यांच्या मदतीला धावून आले आहेत. भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण केली आहे. भुजबळ यांनी आव्हाड याांची पाठराखण केल्याने अजितदादा गटाचेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजबळांवर टीका केली आहे. या निमित्ताने आता मुश्रीफ आणि भुजबळ यांच्यातच जुंपली आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पत्रक फाडलं हे निंदनीय आहेच. पण आमच्या छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची बाजू घेतली. मनुस्मृतीचा मुद्दा कुठे तरी बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देण्याचं विधान भुजबळ यांनी केलं हे अत्यंत दुर्देवी आहे. भुजबळांनी आव्हाड यांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे. याबाबत त्यांनी बोलायला हवं होतं, अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी भुजबळ यांचा समाचार घेतला आहे.

राज्यसभेवर कोणाला पाठवायचं याचा सर्वस्वी निर्णय आमचे वरिष्ठ नेते अजित दादा पवार घेतील. प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे चर्चा सर्वत्र असताना आता मुश्रीफ यांना त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मला त्या संदर्भात काय माहित नाही आणि राज्यसभेच्या जागे बाबतचा निर्णय आमचे नेते अजित दादा घेतील असे ते म्हणाले.

आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,"निवडणूक आयोगाने आचारसंहितेत दुष्काळ संदर्भात काम करण्यासाठी सूट दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैठक घ्यावी लागली. निवडणूक आयोगाने तात्काळ दुष्काळाच्या कामासाठी सवलत दिली पाहिजे", अशी मागणीही त्यांनी केली.

शेअर करा