मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Hardik Pandya : हार्दिक पांड्याची ४ कोटींची फसवणूक, आरोपी सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे

•Hardik Pandya Step Brother Arrested हार्दिक पांड्याच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूने वैभव पंड्याला अटक केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

hardik-pandya.

•Hardik Pandya Step Brother Arrested हार्दिक पांड्याच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूने वैभव पंड्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी वैभवला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई :- क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केली आहे. वैभव हा आरोपी पंड्या ब्रदर्सचा सावत्र भाऊ आहे. हे प्रकरण २०२१ चे आहे जेव्हा आरोपी वैभवने पंड्या ब्रदर्ससोबत पॉलिमर व्यवसायाची कंपनी सुरू केली होती. कंपनीत हार्दिक आणि कृणालची हिस्सेदारी 40-40 टक्के होती, तर वैभवची 20 टक्के हिस्सेदारी होती. भागीदारीच्या अटींनुसार कंपनीला मिळणारा नफा तिघांमध्ये विभागायचा होता. कंपनीच्या नफ्याची रक्कम पंड्या ब्रदर्सला देण्याऐवजी आरोपी वैभवने वेगळी कंपनी स्थापन करून नफ्याची रक्कम तिच्याकडे वर्ग केली.

पंड्या ब्रदर्सचे सुमारे 4.3 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हार्दिकच्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने वैभव पांड्याला अटक केली आहे. आरोपी वैभवला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा: सामना वृत्तपत्रातून मणिपूर पासून ते काश्मीर पर्यंत होत असलेल्या हिंसाराचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित केले प्रश्न

शेअर करा