मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Hadapsar Vidhansabha | मोहसीन शेख यांच्या खांद्यावर 'तुतारी' : हडपसर मतदार संघात समीकरणे बदलली

तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी मोहसीन शेख यांच्या पाठीशी विद्यमानांची झाली पंचाईत युवक प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

M
mubarak

1 मिनिट वाचन

hadapsar vidhansabha mohseen shaikh

  • तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी मोहसीन शेख यांच्या पाठीशी
  • विद्यमानांची झाली पंचाईत
  • युवक प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी
  • पुणे, दि. १२ नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर : Hadapsar Vidhansabha

    कोंढवा-हडपसर येथील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे युवा नेते मोहसीन शेख Mohsin Shaikh यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केल्याने हडपसर विधानसभा मतदार संघातील समीकरणे बदलली आहेत. यामुळे आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना मोठे पाठबळ मिळाले आहे. Hadapsar Vidhansabha

    विद्यमान आमदार यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आमदार योगेश टिळेकर MLA Yogesh Tilekar, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे Nana Bhangire यांच्यासह अनेक स्टार प्रचारक मैदानात असताना एकतर्फी वाटणारी हडपसर विधानसभा निवडणूक खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांच्या रोड शो नंतर रंगात आली आहे. युवा नेते व कोंढवा हडपसर भागात दांडगा जनसंपर्क असणारे मोहसीन भाई शेख यांनी तुतारी खांद्यावर घेतल्याने हडपसर मतदार संघाची समीकरणे बदलली आहेत. Hadapsar Vidhansabha

    युवक प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

    मोहसीन शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश युवक संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व हडपसरचे उमेदवार पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश झाला.

    यावेळी मोहसीन शेख यांनी देशाचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आभार मानले.

    शेअर करा