मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi news : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर; दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा मोदी-शहांवर निशाणा

Delhi news : नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर; दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा मोदी-शहांवर निशाणा
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर; दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा मोदी-शहांवर निशाणा

Delhi news : नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी SIR (विशेष सखोल पुनर्तपासणी) प्रक्रियेसह काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याच्या वृत्तांनंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीसह विविध संघटनांनी मुंबई आणि दिल्लीत आंदोलन करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
दिल्लीमध्ये रविवारी इंडिया गेट ते जंतर-मंतर असा मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केली होती. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान AISA नेत्या नेहा बोरा यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.https://maharashtramirror.com/ Delhi news
नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यावर आंदोलकांचा गोंधळ
नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना एका खासगी वाहनातून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी वाहनाला घेराव घालत रस्ता अडवला. पोलिसांनी आंदोलकांना वाहनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. नेहा बोरा यांना नंतर दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आल्याचे वृत्त आहे.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा
या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. दिल्लीतील आंदोलनाचा व्हिडीओ शेअर करत राऊत यांनी आंदोलकांनी पोलिसांच्या कारला घेराव घातल्याचा संदर्भ देत मोदी-शहा सरकारवर टीका केली.
राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये दिल्लीतील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा दावा करत, “मोदी-शहा वगैरेंची दहशत या पोरांनी नष्ट केली आहे,” असे म्हटले. तसेच नेहा बोरा यांना ज्या गाडीत नेण्यात येत होते, तीच गाडी आंदोलकांनी अडवल्याचा उल्लेख त्यांनी केला.
याच पोस्टमध्ये राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधत, “अमित शाह भूमिगत आहेत. थांबा, आणखी बरंच काही बघायचं आहे. महाराष्ट्रात आज ट्रेलर दिसला आहे,” असे म्हटले.
मुंबईत ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात महाविकास आघाडीतील विविध नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
Tउद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपसाठी ‘शस्त्र’ म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
मुंबई आणि दिल्लीतील या आंदोलनांमुळे ज्ञानेश कुमार, SIR प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा