मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये भीषण दुर्घटना : महिसागर नदीवरील पूल कोसळला, 9 मृत; वाहनं नदीत कोसळली!

•पहाटेच्या शांततेत कोसळला 43 वर्षांपूर्वीचा जुना पूल; इको व्हॅन, ट्रक, ऑटो रिक्षा थेट नदीत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये भीषण दुर्घटना : महिसागर नदीवरील पूल कोसळला, 9 मृत; वाहनं नदीत कोसळली!

•पहाटेच्या शांततेत कोसळला 43 वर्षांपूर्वीचा जुना पूल; इको व्हॅन, ट्रक, ऑटो रिक्षा थेट नदीत

ANI | गुजरातमधील बडोद्याजवळील महिसागर नदीवर असलेला जुना पूल बुधवारी पहाटे अचानक कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या भीषण घटनेत 9 जणांचा मृत्यू, तर किमान 9 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दुर्घटनेनंतर नदीत अडकलेल्या वाहनांमधून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

ही दुर्घटना बडोद्याच्या पड्रा तालुक्यातील मुजपूर येथे घडली. पुलावरून जात असलेली इको व्हॅन, दोन ट्रक, पिकअप व्हॅन आणि एक ऑटो रिक्षा थेट महिसागर नदीत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, नदीत कोसळलेला एक टँकर अर्धवट अडकलेला दिसतोय, तर पाण्यात बुडालेल्या वाहनामध्ये अडकलेला एक मुलगा आणि त्याच्या मदतीसाठी ओरडणारी त्याची आई – हे हृदयद्रावक दृश्य थरकाप उडवणारे ठरत आहे.

बडोद्याचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "सद्यस्थितीत 5 जण किरकोळ जखमी अवस्थेत वाचवण्यात आले आहेत. 2 मृत्यूंची आधीच पुष्टी झाली होती. नंतर आकडा 9 पर्यंत पोहोचला. ओळख अद्याप पूर्ण झाली नाही. बचावकार्य वेगात सुरू असून, एनडीआरएफ व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत."

या घटनेतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, हा पूल तब्बल 43 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि केवळ गेल्या वर्षीच त्याची डागडुजी करण्यात आली होती. तरीही तो आज पहाटे कोसळला.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, “बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर पुलाची सखोल चौकशी केली जाईल. सध्या सर्वोच्च प्राधान्य मृतदेह बाहेर काढणे आणि जखमींना मदत करणे हेच आहे.”

हेही वाचा: Kalyan Crime News : महिलेच्या अब्रूवर घाला घालणाऱ्या विकृताला कोर्टाचा जोरदार चपराक!

शेअर करा