मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

केरोसीन वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रति शिधापत्रिका ३ लिटर केरोसीन देण्यात येणार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

केरोसीन वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रति शिधापत्रिका ३ लिटर केरोसीन देण्यात येणार

पुणे: माहे मार्च २०२६ कालावधीसाठी केरोसीन (रॉकेल) वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रति शिधापत्रिका ३ लिटर केरोसीन देण्यात येणार आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना प्राधान्य देण्यात येणार असून, उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेले कुटुंब (ग्रामपंचायत दाखल्यासह) तसेच स्थलांतरित मजूर यांनाही वितरण केले जाईल.
केरोसीनचा संपूर्ण कोटा वाटप दिनांकापासून ४५ दिवसांत उचलणे बंधनकारक असून, उर्वरित साठा पुढे नेण्यात येणार नाही.
वितरण प्रक्रिया तेल कंपन्यांचे वितरक, किरकोळ परवानाधारक/रास्तभाव दुकानदार, लाभार्थी अशा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यास ३ लिटर प्रमाणे वाटप करणे आवश्यक असून, दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले राहतील.
तेल कंपन्यांनी पुरवठा नियमित ठेवावा, तसेच ८५% केरोसीन पहिल्या पंधरवड्यात उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या देखरेखीखाली वितरण होणार असून, गैरवापर टाळण्यासाठी संयुक्त तपासणी पथक (तहसीलदार, पुरवठा अधिकारी, पोलीस) नियुक्त करण्यात येणार आहे. केरोसीनचा वापर फक्त घरगुती कारणासाठीच करता येणार असून, भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

guidelines-issued-kerosene-distribution

शेअर करा