मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kohlapur News : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला! १० नोव्हेंबरला निवडणूक सभा; उच्च न्यायालयाचे आदेश

Kohlapur News : कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला! १० नोव्हेंबरला निवडणूक सभा; उच्च न्यायालयाचे आदेश
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला! १० नोव्हेंबरला निवडणूक सभा; उच्च न्यायालयाचे आदेश

Kohlapur News : कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठीची दुसरी सभा १० नोव्हेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News :

न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. तसेच, गोकुळच्या नवनिर्वाचित २५ संचालकांना आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सभेची नोटीस बजावण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवडीसाठी सभा पार पडणार आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडून ३ नोव्हेंबर रोजीच अध्यक्ष निवडीची सभा घेण्यासाठी कायदेशीर लढा दिला जात होता. मात्र, न्यायालयाने आता १० नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या गोटात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, हा महायुतीसाठी धक्का मानला जात आहे.

१३ विरुद्ध १२; अध्यक्षपदासाठी चुरस
गोकुळ दूध संघाच्या यंदाच्या निवडणुकीत २५ संचालकांपैकी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे १३ संचालक निवडून आले, तर महायुतीचे १२ संचालक विजयी झाले. त्यामुळे समविचारी आघाडीला संख्याबळाचे पारडे जड असले, तरी अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेले राजकीय गणित अद्याप महत्त्वाचे ठरणार आहे.

गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या सभेत आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने अध्यक्ष निवड होऊ शकली नव्हती. महायुतीच्या संचालकांनी या सभेकडे पाठ फिरवल्याने निवड प्रक्रिया रखडली होती.

दरम्यान, समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील सभेत कोरमअभावी निवड प्रक्रिया रखडल्याने समविचारी आघाडीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

आता उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी सभा घेण्याचे आदेश दिल्याने गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. या सभेला कोण उपस्थित राहणार आणि अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा