मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ghatkopar Crime News : घाटकोपरमध्ये 'वॉक'ला गेलेल्या वृद्धाची लोखंडी सळईने क्रूर हत्या!

Ghatkopar Attempt To Murder News : मुंबईत पुन्हा 'क्रूरतेचा' कळस: हत्येचे गूढ कायम, पोलीस तपासात व्यस्त!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Murder News

Ghatkopar Attempt To Murder News : मुंबईत पुन्हा 'क्रूरतेचा' कळस: हत्येचे गूढ कायम, पोलीस तपासात व्यस्त! रात्रीच्या शांततेत 'घात': 65 वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

मुंबई :- मुंबईतील घाटकोपर परिसरात गुरुवारी रात्री चालण्यासाठी गेलेल्या 65 वर्षीय वृद्धाची अज्ञाताने क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेंद्र पाचडकर (वय 65, रा. त्रिवेणी सोसायटी, विक्रोळी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मधुमेह असल्याने सुरेंद्र पाचडकर यांना जेवणानंतर दररोज रात्री परिसरात फेरफटका मारण्याची सवय होती. मात्र, गुरुवारी रात्री त्यांना हा फेरफटका जीवघेणा ठरला. एका अनोळखी हल्लेखोराने त्यांच्या डोक्यात लोखंडी सळईने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. Ghatkopar Latest Crime News

उपचारादरम्यान मृत्यू: मुंबई हादरली

घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. माहिती मिळताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी अवस्थेतील सुरेंद्र पाचडकर यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान रात्री 12 च्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात एका निरपराध वृद्धाची अशा प्रकारे हत्या झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. Ghatkopar Latest Murder News

'अज्ञात' मारेकऱ्याचा शोध सुरू: हत्येचे कारण अस्पष्ट

या धक्कादायक घटनेप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तातडीने हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की त्यामागे अन्य कोणते वैयक्तिक कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या तरी मारेकरी कोण आहे आणि हत्येमागील नेमके कारण काय आहे, हे अस्पष्ट आहे. या घटनेमुळे मुंबईतील रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेअर करा