मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ghatkopar Breaking News : घाटकोपर हादरले! सराफाच्या दुकानात दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा; मालकावर चाकूने हल्ला करून लाखोचे दागिने लुटले

Ghatkopar Latest Crime News : आरोपींच्या हल्ल्यात दुकान मालक दर्शन मेटकरी गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचार सुरू ; घाटकोपर पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी 6 पथके तैनात; परिसरात खळबळ

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ghatkopar Breaking News : घाटकोपर हादरले! सराफाच्या दुकानात दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा; मालकावर चाकूने हल्ला करून लाखोचे दागिने लुटले

Ghatkopar Latest Crime News : आरोपींच्या हल्ल्यात दुकान मालक दर्शन मेटकरी गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचार सुरू ; घाटकोपर पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी 6 पथके तैनात; परिसरात खळबळ

मुंबई (घाटकोपर) :- मुंबईतील घाटकोपर परिसरामध्ये आज (बुधवारी) सकाळी दिवसाढवळ्या एका सराफाच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. गोळीबार रोड परिसरातील 'दर्शन ज्वेलर्स' या दुकानात घुसलेल्या तिघांनी दुकान मालकावर चाकूने हल्ला करून दुकानातील सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. या घटनेमुळे संपूर्ण घाटकोपर परिसरात खळबळ उडाली आहे. Ghatkopar Amrut Nagar Latest News

बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. दुकान मालक दर्शन मेटकरी यांनी नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता दुकान उघडले होते. त्यानंतर काही वेळातच दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी आरोपींनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला.

आरोपींनी दुकानात येताच दर्शन मेटकरी यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेटकरी यांनी या दरोड्याला धैर्याने विरोध केला. मालकाकडून विरोध होताच आरोपींनी त्यांच्यावर चाकूने गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात दर्शन मेटकरी Darshan Metkari Jewellery Shop गंभीर जखमी झाले. Ghatkopar Breaking News

हल्ला केल्यानंतर आरोपींनी दुकानातील सोन्याचे दागिने लुटले आणि तत्काळ घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी दर्शन मेटकरी यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा विशेष पथके तैनात केली आहेत. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. Ghatkopar Police Latest News

शेअर करा