Gautam Gambhir : गौतम गंभीरने सिद्धिविनायक गणपतीचे घेतले दर्शन
•Gautam Gambhir At Siddhivinayak Temple भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी घेतले बाप्पांचे आशीर्वाद
1 मिनिट वाचन

•Gautam Gambhir At Siddhivinayak Temple भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी घेतले बाप्पांचे आशीर्वाद
मुंबई :- भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले आहेत. गौतमने त्यांची पत्नी नताशा जैन यांच्यासोबत मंदिरात पूजा केली.
छायाचित्रे · 1/2
Arrow Keys ⟵ ⟶
भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. गंभीरने त्याच्या एक्स अकाउंटवर पत्नीसोबत सिद्धिविनायक मंदिराचा फोटोही शेअर केला आहे.
गुरवार, (15 मे ) रोजी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी सहपत्नीक "श्रीं" चे दर्शन घेतले. यावेळी न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, राज्यमंत्री दर्जा यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत न्यासाचे कार्यकारी अधिकारी वीणा पाटील व उप कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप राठोड हे उपस्थित होते.




