मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai news : पक्ष सोडण्याचे वृत्त निराधार : गजानन कीर्तिकर

Mumbai news :मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्ष सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पक्ष सोडण्याचे वृत्त निराधार : गजानन कीर्तिकर
पक्ष सोडण्याचे वृत्त निराधार : गजानन कीर्तिकर

Mumbai news :शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास; शिवसेनेला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार असल्याचे स्पष्टीकरण

Mumbai news :मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्ष सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण नाराज असल्याचे तसेच पक्ष सोडणार असल्याचे वृत्त निराधार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाधानाने काम करत असल्याचे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

“मी शिवसेना पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांमुळे मला आश्चर्याचा धक्का बसला. पक्ष सोडण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. हे वृत्त निराधार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाधानाने काम करत असून, अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा इरादा नाही,” असे कीर्तिकर यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचेही कीर्तिकर यांनी सांगितले. त्यांना आपण वस्तुस्थिती स्पष्ट केली. शिंदे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असून, शिवसेना सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कोणत्याही पक्षाकडून आपल्याला प्रवेशाची ऑफर आलेली नसल्याचेही कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षातील कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेतृत्व यांच्यात नियमित संपर्क असणे आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी खासदार म्हणून व्याधिग्रस्त आणि अन्यायग्रस्त नागरिकांची कामे करताना मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुखांशी तातडीने संपर्क साधण्याची गरज भासते. ही संपर्कातील अडचण दूर करण्यासाठी व्यवस्था करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे कीर्तिकर यांनी सांगितले.

पक्षातील नेत्यांची महिन्यातून किमान एक बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक म्हणून काम करताना पक्ष संघटनेसाठीही पुरेसा वेळ दिला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

एकनाथ शिंदे यांच्याशी भेट होत नसल्यामुळे कीर्तिकर नाराज असल्याची तसेच ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेसधार्जिणी होत होती आणि पक्षाचा मराठी बाणा हरवत होता, त्यामुळे आपण त्यावेळी पक्ष सोडल्याचेही त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा