मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Gajanan Kale : खासदार संजय राऊत यांच्या टिकेला राज ठाकरे च्या नेत्याकडून प्रत्युत्तर

Gajanan Kale Reply Sanjay Raut : संजय राऊत यांच्या टीकेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Gajanan Kale Reply Sanjay Raut

Gajanan Kale Reply Sanjay Raut : संजय राऊत यांच्या टीकेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अबू आझमीला कडेवर….

मुंबई :- राज ठाकरे Raj Thackeray महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अबू आझमीला कडेवर घेऊन नाचत आहेत याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का ? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

मनसेचे नेते गजानन काळे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून मनसेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये गजानन काळे यांनी म्हटले की,2014 पासून 2019 पर्यंत मोदींच्या आणि भाजपच्या - मांडीवर कडेवर बसून सत्तेची मौज लुटली… तेव्हा महाराष्ट्र द्रोही असल्याची लाज वाटली नाही का ??? ..आता राजसाहेब ठाकरेंनी , मनसेने महायुतीला पाठींबा दिला तर मनोरुग्ण राऊतांचा तिळपापड झाल्याचं दिसतय…तुमचे उद्धव ठाकरे त्या ‘औरंग्याची औलाद’ अबू आझमीला कडेवर घेऊन नाचत आहेत याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का ???..या महाराष्ट्र द्रोही अबू आझमी बरोबर युती केल्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील.???

हेही वाचा: Sanjay Raut : 17‌ मे महाविकास आघाडीची सांगता सभा मुंबईत होणार… खासदार संजय राऊत यांची माहिती

शेअर करा