मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेतेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

•राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात

V
Vivek

1 मिनिट वाचन

ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेतेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

•राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात

मुंबई : - शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यात भाकरी फिरवण्यात आली असून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या बालकिल्यात शिंदे गटाने सुरुंग लावत अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मागील अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असून आता विरोधकातील पक्षांना शिंदे गटाकडून सुरुंग लावण्यात आला आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुढील चार महिन्यात राज्यात अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका मनाली पाटील, महेश साळवी, मनीषा साळवी तसेच ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन मात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : ऑपरेशन सिंदूर नंतर, उद्धव ठाकरेंचा पक्ष यावेळी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार का? संजय राऊत म्हणाले- 'सेनेचा अभिमान आहे, पण…'

शेअर करा