मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Call Center Call Scam : मिरा रोड येथे बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश ; अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा भांडाफोड

Mira Road Police Busted Call Scam Center : बेकायदेशीररित्या चालवले जाणारे हे कॉल सेंटर दररोज तब्बल कोटी रुपये कमवत असल्याचे उघड झाले आहे.या छाप्यात कंपनीच्या मालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mira Road Call Center Call Scam : मिरा रोड येथे बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश ; अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा भांडाफोड

Mira Road Police Busted Call Scam Center : बेकायदेशीररित्या चालवले जाणारे हे कॉल सेंटर दररोज तब्बल कोटी रुपये कमवत असल्याचे उघड झाले आहे.या छाप्यात कंपनीच्या मालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे

मिरा रोड :- मिरा रोड येथे चालवले जात असलेल्या एका मोठ्या बोगस कॉल Mira Road Fake Call Center सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. Mira Road Police पोलिसांनी या कॉल सेंटरचा भांडाफोड केला असून सात आरोपींना अटक केली आहे. अमेरिकेतील नागरिकांना ॲमेझॉन च्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या या कॉल सेंटरकडून पोलिसांनी चार लॅपटॉप आणि पाच मोबाईल आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या शाहरुख शेख (30 वय,रा. नायगाव) इम्रान खान (27 वय रा. मिरा रोड) यांच्यासह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ॲमेझॉन कंपनीच्या अमेरिका देशातील ग्राहकांना इंटरनेट द्वारे ॲमेझॉन कंपनीच्या खोटे कस्टमर केअर नंबर देत असत. कस्टमर ने कॉल केलेले कॉल या बोगस कॉल सेंटरवर येत असे त्यानंतर लॅपटॉप मोबाईल आणि इंटरनेट उपकरणाद्वारे लॅपटॉप मध्ये लॅपलिकेशनचा वापर करून त्यांचे कॉल स्वीकारले जात असत. ॲमेझॉन कंपनीचे प्रतिनिधित्व असल्याचे भाषण कस्टमर चे ॲमेझॉन खाते हॅक करून त्यांच्या आयपी हॅक करण्यात आल्याचे खोटे सांगून मोबाईल व ॲमेझॉन खात्याचा वापर करून ॲमेझॉन वेबसाईटवरून वस्तू खरेदी करून त्यांना पुन्हा पुन्हा रद्द केल्याने चार्ज भरावा लागत असेल. असे न केल्यास ॲमेझॉन खात्याशी निगडित असलेल्या बँक खात्यातून दंडात्मक रक्कम काढली जाईल असा अशी भीती घालत ग्राहकांकडून वेगवेगळे रक्कम इतर खात्यात वळती करत असे. अशा बोगस कॉल सेंटरचा मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींकडून चार लॅपटॉप पासून मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. त्यांच्या विरोधात 2023 चे कलम 319(2), 318(4),308(3), 61(2) सह इंडीयन टेलीग्राफ ॲक्टचे कलम 25 (ब) प्रमाणे दि.25 जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गुन्हयाचा पुढील तपास मध्यवर्ती गुन्हे कक्षाकडुन करण्यात येत आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तेजश्री शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, संतोष चव्हाण, पोलीस हवालदार प्रविणराज पवार, पोलीस शिपाई नितीन राठोड, अंगद मुळे, राहुल बन तसेच महीला पोलीस अंमलदार पुजा हांडे यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.

शेअर करा